VIDEO: शमीने आपल्या कृतीने जिंकली मने, कार अपघातानंतर लोकांचा वाचवला जीव

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(mohammad shami) विश्वचषक २०२३ने(world cup 2023) कमालीची कामगिरी क्ली. त्याने सर्वाधिक २४ विकेट मिळवल्या होत्या. यातच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लोकांची मने जिंकतील असे काम केले आहे. कार अपघातात जखमी झालेल्या लोकांना शमीने केवळ वाचवलेच नाही तर त्यांची मदतही केली. भारतीय वेगवान गोलंदाज शमीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यानंतर चाहते त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.





विश्वचषकानंतर ब्रेकवर शमी


विश्वचषक २०२३मध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करताना १० सामने जिंकले होते. दरम्यान, फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषकानंतर वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताचा युवा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळला आहे. दुसरा सामना आज तिरूअनंतपुरम येथे खेळवला जात आहे. दरम्यान, सामन्यात पावसाचा व्यत्यय होऊ शकतो.


टीम इंडिया पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. या दौऱ्यात संघाला ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत. कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळू शकते. ही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे.

Comments
Add Comment

Mayank Yadav : मयंक यादवची विक्रमी गोलंदाजी! पहिल्याच चेंडूवर विकेट!

भारताचा युवा वेगवान (Fast Bowler) गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) दुखापतीतून (Injury) पुनरागमन (Comeback) केल्यानंतर दमदार लयीत दिसत आहे.

Commonwealth Games 2026 Raja Muthupandi : कॉमनवेल्थमध्ये भारताचा दबदबा; गंभीर दुखापतीनंतर राजा मुथुपंडीने जिंकले रौप्यपदक

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) मध्ये भारताच्या वेटलिफ्टिंग संघाने (Weightlifting) दमदार कामगिरी कायम ठेवत आणखी एक

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Rishikant Singh : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऋषिकांत सिंगला रौप्य पदक

ग्लासगो : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपले दुसरे पदक मिळवले. ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६०

Ind vs Zim : वैभव सूर्यवंशीचा वादळी खेळी ! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवले इतक्या धावांचे आव्हान

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स