नांदगाव : मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) नांदगाव दत्तमंदिर येथे चारचाकी मारुती स्विफ्ट कार (Maruti Swift car) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीने प्रवासी निवारा शेड, रॅम्प जमीनदोस्त करून टाकली. यामध्ये शेडमधील दोन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या. एका युवतीचे दोन्ही पाय जायबंदी होऊन गंभीर दुखापत झाली. ही घटना सकाळी ८:३० च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरीहून गोव्याकडे जाणारा चारचाकी चालक निनाद सुभाष शिरदनकर (रत्नागिरी) नांदगाव दत्तमंदिर पाटील वाडी जवळ आला असता वाहनावरील ताबा सुटला आणि भयंकर वेगाने लगतच्या निवारा शेडला धडक देऊन त्यापुढील लोखंडी रॅम्प तोडून रस्त्यावर पलटी झाला.
यावेळी शेडमध्ये दोन महाविद्यालयीन युवती कणकवली येथे महाविद्यालयात जाण्यासाठी थांबल्या होत्या.या अपघातात प्रेरणा राजेंद्र तांबे (वय १८ वर्षे) गंभीर जखमी असून तिचे दोन्ही पाय जायबंदी असल्याचे सांगितले गेले. तिला उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरी युवती व चालक किरकोळ जखमी झाले. अधिक तपास कणकवली पोलीस करत असून पोलिस चंद्रकांत माने घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते.
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…