Fungus disease : तुरीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी पुन्हा चिंतेत

रब्बी हंगामात करावा लागणार अवकाळीचा सामना


बुलढाणा : अनियमित पाऊस (Irregular Rain) आणि बदलते खराब हवामान (Bad weather) याचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे. बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते त्यामुळे निदान रब्बी हंगामात (Rabi Season) चांगली पिके होतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, खराब हवामानामुळे रब्बी हंगामातील तुरीच्या पिकावर 'फायटोप्थोरा ब्लाईट' (Phytophthora blight) या बुरशीजन्य रोगाचा (Fungus disease) प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील सहा लाख हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात आलं आहे.


खरीप हंगामाच्या वेळी राज्यांत अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील अनेक भागांत कमी पाऊस पडल्याने खरीप पिके झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता थोडीफार तुरीच्या पिकाची अपेक्षा होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीचं पीक हिरवेगार होतं. मात्र, याही पिकांवर बदलत्या वातावरणामुळे 'फायटोप्थोरा ब्लाईट' या बुरशीजन्य रोगानं शिरकाव केला आहे. आता हिरवंगार तुरीचं पीक पिवळं पडून सुकू लागलं आहे.


राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. पण या रोगामुळे तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही याच रोगाने तुरीचं उत्पादन जवळपास ५० ते ६० टक्के घटलं होतं. त्यामुळे फायटोप्थोरा ब्लाईट या रोगाचा प्रादुर्भाव दिसताक्षणी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.



रब्बीच्या हंगामात बळीराजाचा अवकाळीशी सामना


रब्बीच्या हंगामात राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Rain Updates) तडाखा बसण्याचा इशारा हवामान विभागाच्या (Department of Meteorology) वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळीशी (Unseasonal Rain) सामना करावा लागणार आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह