नवी दिल्ली: मोबाईल निर्यातीच्या(mobile export) बाबतीत सरकारसाठी खुशखबर आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ७ महिन्यात ८ बिलियन डॉलरची निर्यात झाली आहे. यात अधिकाधिक भाग हा आयफोनचा आहे.
एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान अॅपल इंकने भारतातून तब्बल ५ अब्ज डॉलरहून अधिक किंमतीचे आयफोन निर्यात केले. देशातून आयफोनची निर्यात गेल्या वर्षी एप्रिल-ऑक्टोबरच्या तुलनेत १७७ टक्क्यांनी वाढली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्ण यांनी ट्वीट करत सांगितले की या आर्थिक वर्षाच्या ७ महिन्यांत ८ बिलियन डॉलरची मोबाईल निर्यात करण्यात आली. वार्षिक आधारावर ६० टक्के वाढीची नोंद करण्यात आली.
बिझनेस स्टँडर्डच्या एका रिपोर्टनुसार, इंडस्ट्री आणि सरकारच्या डेटानुसार आयफोन बनवणारी कंपनीने एप्रिल-ऑक्टोबर २०२२मध्ये ठेक्यावर आयफोन बनवणाऱ्या ३ कंपन्यांच्या माध्यमातून देशातून १.८ लाख डॉलर किंमतीचे हँडसेट निर्यात केले होते.
निर्यात होणाऱ्या एकूण स्मार्टफोनमध्ये आयफोनची भागीदारी वाढली
अॅपलने मोबाईल फोनसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह स्कीमअंतर्गत तिसऱ्या वर्षात देशात विनिर्माण वाढवला आहे. यासाठी देशातून निर्यात होणाऱ्या एकूण स्मार्टफोनमध्ये आयफोनचा हिस्सा वाढला आहे.