Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीIsrael-Hamas War: इस्त्रायल-हमास यांच्यात युद्धविराम? गाझामध्ये कैद केलेल्या ५० जणांच्या बदल्यात चार...

Israel-Hamas War: इस्त्रायल-हमास यांच्यात युद्धविराम? गाझामध्ये कैद केलेल्या ५० जणांच्या बदल्यात चार दिवस युद्ध बंद

नवी दिल्ली: मिडल ईस्टमध्ये इस्त्रायल आणि गाझा पट्टीवर शासन करणाऱ्या हमास यांच्यातील युद्ध आता थांबणार आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यात ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. खरंतर बुधवारी २२ नोव्हेंबरला इस्त्रायलच्या सरकारने हमासोबत गाझामध्ये बंदी बनवलेल्या ५० महिला आणि मुलांच्या सुटकेच्या बदल्यात युद्ध ४ दिवस थांबवण्याच्या कराराला समर्थन केले आहे. यामुळे लवकरच हमाससोबतचे युद्ध थांबण्याचे चित्र दिसत आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या यु्द्धामध्ये मध्यस्थी करणाऱ्या कतार, अमेरिका, इस्त्रायल आणि हमासच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शांततेसाठी करार करणे खूप गरजेचे आहे. इस्त्रायल सरकारच्या आकड्यानुसार, ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यानंर हमासच्या दहशतवाद्यांनी लोकांना बंदी बनवले होते. तसेच त्यांना गाझा पट्टीत नेण्यात आले. इस्त्रायलचे म्हणणे आहे गाझा पट्टीत हमासकडून २००हून अधिक जणांना बंदी बनवण्यात आले आहे. यात वयस्कर तसेच महिलांचाही समावेश आहे.

दर १० बंदीवानांच्या सुटेकसाठी एक दिवस थांबणार युद्ध

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडून जारी केलेल्या विधानानुसार चार दिवसांमध्ये ५० महिला आणि मुलांना सोडले जाईल. या दरम्यान, दोन्ही बाजूंकडून युद्ध थांबवले जाईल. प्रत्येक अतिरिक्त १० बंदी केलेल्या सुटकेनंतर एक दिवसांचा युद्धविराम वाढवला जाईल. दरम्यान, याच्या बदल्यात पॅलेस्टाईनच्या बंदी केलेल्यांना सोडले जाणार की नाही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

पहिल्यांदा इस्त्रायल-हमास यांच्यात करार

गाझामध्ये सातत्याने होत असलेल्या बॉम्बहल्ल्यादरम्यान ही पहिलीच घटना जेव्हा इस्त्रायल युद्ध थांबवण्यासाठी तयार झाले. गाझामध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत १३हजाराहून अधिक पॅलेस्टाईन नागिक मारले गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -