IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस; भारताला दिली फलंदाजी

रोहित, शुभमनच्या फटकेबाजीला सुरुवात; रोहितचे दोन चौकार


अहमदाबाद : आज क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) सगळ्यांत मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या इच्छेप्रमाणे प्रथम फलंदाजी करण्याचीच संधी भारताला मिळाली आहे.


भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) सध्या मैदानात उतरले आहेत. तुफान फटकेबाजीला सुरुवात करत त्यांनी प्रचंड धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला द्यायचे ठरवले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाही तितक्याच ताकदीनेफिल्डंग करत आहे. रोहित शर्माने होत असलेले दोन चौकार ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी अडवले. मात्र, पुढच्या दोन चेंडूंवर शानदार खेळी करत रोहितने दोन चौकार ठाकले आहेत. दोन ओव्हर्समध्ये भारताने १३ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे