Whale Rescue operation : गणपतीपुळ्यात व्हेल माशाच्या पिलाचं देशातील सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

तब्बल ४० तास सुरु होते प्रयत्न


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule) येथे व्हेल माशाच्या पिलाचं (Whale Fish) रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं. व्हेलला जिवंत पाण्यात सोडण्याचं हे देशातील पहिलं रेस्क्यु ऑपरेशन ठरलं आहे. तब्बल २० फूट लांब आणि पाच टन वजनाच्या व्हेलला वाचवण्यासाठी ४० तास या शर्थीचे प्रयत्न केले गेले. त्यानंतर रात्री ११च्या सुमारास व्हेल माशाचं पिल्लु समुद्रात सुखरूप सोडण्यात यश आलं.


कोस्टगार्डसह सर्वच विभागांच्या प्रयत्नांना अखेर ४० तासांनंतर यश आलं. समुद्रामध्ये जवळपास ४ ते ५ किलोमीटर आतमध्ये या व्हेल माशाच्या पिल्लाला सोडल्यानंतर गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सर्वांनी जल्लोष केला. दरम्यान, हे ऑपरेशन यशस्वी होऊन जवळपास १५ तास लोटलेले आहेत. त्यामुळे सदरचं पिल्लू सुरक्षित असावं असा आशावाद आहे.


सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचं पिल्लू किनाऱ्यावर असल्याचं दिसून आलं. त्याच दिवशी जवळपास तीन वेळा माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडलं गेलं. परंतु, १४ नोव्हेंबरला सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसलं. भरतीच्या वेळी समुद्रात पाठवण्याचे दोनदा प्रयत्न केले. पण हा मासा पुन्हा किनाऱ्यावर आला. दोन क्रेनच्या साह्याने या पाच टन वजनाच्या व्हेलला हलवणे कठीण झाले होते.


पर्यटक, स्थानिक नागरीक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर 'ऑपरेशन व्हेल' सुरू करून काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रामध्ये सोडण्यात यश आलं. हे ऑपरेशन यशस्वी झालं असलं तरी इतर कुठल्या भागामध्ये हे पिल्लू किनारपट्टीवरती मागे फिरत नाहीये ना? याकडे देखील सध्या लक्ष ठेवले जात आहे.


Comments
Add Comment

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे