World cup 2023: शुभमनने तोडला रोहित-कोहलीचा रेकॉर्ड

मुंबई: भारताने विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) ४५व्या सामन्यात नेदरलँड्सला(netherlands) १६० धावांनी हरवले. या दरम्यान, शुभमन गिलने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले. गिलने केवळ ३२ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याने या अर्धशतकी खेळीदरम्यान एक रेकॉर्ड आपल्या नावे केला. गिल भारतासाठी एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करण्याच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला.


भारतासाठी एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक वनडे धावा करण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने १९९८मध्ये १८४९ धावा केल्या होत्या. सौरव गांगुली दुसऱ्या स्थानावर आहे. गांगुलीने १९९९मध्ये १७६७ धावा केल्या होत्या. राहुल द्रविडने १७६१ धावा केल्या होत्या. चौथ्या स्थानावर पुन्हा सचिन आहे. त्याने १९९६मध्ये १६११ धावा केल्या होत्या.


शुभमनने या वर्षी १५०० धावा केल्या आहेत. याबाबतीत त्याने रोहित आणि कोहलीला मागे टाकले आहे. रोहितने २०१९मध्ये १४९० धावा केल्या होत्या. कोहलीने २०१७मध्ये १४६० धावा केल्या होत्या.


भारताने नेदरलँड्सविरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करताना ५० षटकांत ४ बाद ४१० धावा केल्या होत्या. यादरम्यान गिलने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. रोहित शर्माने ५४ बॉलमध्ये ६१ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. विराट कोहलीने ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी शतक ठोकले. राहुलने ६४ बॉलमध्ये १०२ धावा केल्या. अय्यरने ९४ बॉलमध्ये १२८ धावा केल्या.


भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास उतरलेला न्यूझीलंडचा संघ २५० धावांवर ऑलआऊट झाला. यासाठी टीम इंडियाकडून कोहली, शुभमन, रोहित शर्मा यांनी बॉलिंग केली. कोहलीने १३ धावांवर एक विकेट मिळवला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

Commonwealth Games 2026 Mirabai Chanu : ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू करणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टिंग संघाचे नेतृत्व

नवी दिल्ली : ग्लासगो येथे होणाऱ्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघाची घोषणा

India vs Pakistan FIH Hockey Pro League : भारताचा पाकिस्तानवर गोलांचा पाऊस! FIH प्रो हॉकी लीगमध्ये ७-१ ने दणदणीत विजय

लंडन : भारताच्या पुरुष हॉकी संघाने FIH प्रो हॉकी लीगमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पुन्हा एकदा धुव्वा उडवत

India vs Ireland T20 : आयर्लंडचा ऐतिहासिक विजय! टीम इंडियाचा ३४ धावांनी पराभव

बेलफास्ट : बेलफास्ट (Belfast) येथे झालेल्या पहिल्या टी-२० (T20) सामन्यात आयर्लंडने (Ireland) विश्वविजेता (World Champion) भारताचा (India) ३४

Abhishek Sharma : भारत हरला, पण अभिषेक शर्मा चमकला! अभिषेकची विक्रमी खेळी; टी-20 मध्ये रचला इतिहास

India vs Ireland T20I :  आयर्लंडविरुद्ध (Ireland) पहिल्या टी-20 (T20I) सामन्यात भारताला (India) ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या

FIFA World Cup 2026 : स्पेनचा उरुग्वेवर १-० असा विजय; उरुग्वे स्पर्धेबाहेर

स्पेनने (Spain) उरुग्वेचा (Uruguay) १-० असा पराभव करत फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2026) स्पर्धेच्या राऊंड ऑफ ३२ (Round of 32) मध्ये धडक मारली.

FIFA World Cup 2026 : फ्रान्सची विजयी घोडदौड कायम! Ousmane Dembele च्या हॅट्ट्रिकने नॉर्वेचा पराभव

FIFA World Cup 2026 : फ्रान्सने (France) गट 'आय'मध्ये (Group I) अव्वल स्थान (Top Spot) निश्चित करत नॉर्वेचा (Norway) ४-१ असा पराभव केला. या सामन्यात