Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Pollution : ऐन दिवाळीत बरसणार पाऊस! येत्या २४ तासांत राज्यभरात पावसाची...

Mumbai Pollution : ऐन दिवाळीत बरसणार पाऊस! येत्या २४ तासांत राज्यभरात पावसाची शक्यता

मुंबईतल्या हवेच्या गुणवत्ता पातळीत काहीशी सुधारणा

मुंबई : ऐन दिवाळीत (Diwali) मुंबईतील हवेची गुणवत्ता (Air Quality) खालावल्याने मुंबईकरांना श्वसनाचे त्रास उद्भवत आहेत. त्यातच मुंबईच्याच नव्हे तर राज्यभरातल्या वातावरणात अनपेक्षित बदल होत आहेत. हवामान विभागाच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे. ऐन हिवाळ्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून देशासह राज्यातील काही भागांमध्ये काल बुधवारी पावसाने हजेरीदेखील लावली. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी आरोग्याची प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने मान्सूनसाठी अनुकून परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये सध्या पावसाच्या सरी बरसत आहेत. शुक्रवार म्हणजेच १० नोव्हेंबरपर्यंत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, शनिवारनंतर राज्यात सगळीकडेच हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सध्याच्या दिवसांत सकाळच्या आणि पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी तर दिवसा मात्र प्रचंड ऊन अशी परिस्थिती आहे. त्यातच आता पाऊसही बरसल्याने हवामानाचा नेमका अंदाच लावणेही फार कठीण झाले आहे. दुसरीकडे वाढलेल्या वायू प्रदूषणाचा फटका मुंबईकरांना बसत आहे. वाढलेल्या धूळ आणि धुरक्यामुळे दूरवर पाहण्याची दृश्यमानता कमी झाली आहे.

काल कोसळल्या पावसाच्या सरी

काल मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. कोकण किनारपट्टीलाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून जोरदार बरसल्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईतल्या हवेच्या गुणवत्ता पातळीत काहीशी सुधारणा

काल पडलेल्या पावसामुळे धूळ आणि धुरक्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून मुंबईत दृश्यमानतेत वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता काहीशी सुधारल्याचे चित्र आहे. मुंबई हायकोर्टाने प्रदूषण कमी करण्याचे निर्देश दिल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आढावा बैठक घेणार आहेत. हवामान नियंत्रण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातले कर्मचारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -