Rohit Sharma : दहा वर्षांपूर्वी याच दिवशी द्विशतक करणारा रोहित शर्मा आज दुसर्‍याच बॉलवर आऊट!

  229

एक चौकार आणि रोहित शर्मा मैदानाबाहेर... तर विराट कोहलीचा नवा विक्रम


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या वर्ल्डकपची (World Cup 2023) हवा सुरु आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्डकपमधील सर्वाधिक सहा सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) सुरु असणार्‍या भारत विरुद्ध श्रीलंका (India Vs Shrilanka) सामन्यात भारतच बाजी मारणार, असा विश्वास बहुसंख्य चाहत्यांना आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मात्र याबाबत भारतीयांच्या पदरी निराशा पाडली आहे. केवळ एका चौकारावर श्रीलंकेने रोहित शर्माला मैदानाबाहेर पाठवलं.


श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोरदार फलंदाजी करण्यासाठी मैदानात सज्ज झाले. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि स्टेडिअमवर चाहत्यांचा आवाज वाढला. आज रोहित नवा विक्रम रचणार असं भारतीयांना वाटणार तोच श्रीलंकेचा गोलंदाज मधुशंकाने रोहितचा त्रिफळा उडवला आणि वानखेडे स्टेडिअम चिडीचुप्प झाले.


खरं तर २ नोव्हेंबर हा दिवस रोहितसाठी अत्यंत खास आहे. दहा वर्षांपूर्वी याच दिवशी रोहितने त्याच्या करिअरमधील पहिले द्विशतक (Double century) ठोकले होते. तो आज पुन्हा एकदा सर्वोत्तम धावांची खेळी करेल अशी अपेक्षा चाहत्यांची होती, मात्र दुसर्‍याच बॉलवर त्यांच्या पदरी निराशा पडली.



विराट कोहलीचा नवा विक्रम


दरम्यान, विराट कोहलीने (Virat Kohli) मात्र एक नवा विक्रम रचला आहे. एका वर्षात १००० धावा करण्याची ही त्याची आठवी वेळ असल्याने त्याने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडीत काढला आहे. सचिनने हा विक्रम एकूण सात वेळा केला होता. विराटने या वर्षात आतापर्यंत एकूण ९६६ धावा काढल्या होत्या. त्यामुळे हा विक्रम रचण्यासाठी त्याला आजच्या सामन्यात केवळ ३४ धावांची गरज होती. सध्या विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध फॉर्ममध्ये असून विक्रम रचण्यात यशस्वी झाला आहे. यापुढे भारत विरुद्ध श्रीलंका सामना काय रंगत आणणार, कोणाचा विजय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक