Jio World Plaza : मुंबईत सुरू झाले जिओ वर्ल्ड प्लाझा, टॉप ब्रँड्स आणि बरंच काही...

  235

मुंबई: रिलायन्स रिटेलने मंगळवारी मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्धाटनाची घोषणा केली आहे. येथे टॉप अँड रिटेल फॅशन आणि एंटरटेनमेंट एक्सपिरियन्सचा अनुभव मिळू शकतो. मुंबईच्या बीकेसी स्थित या प्लाझाचे दरवाजे सामान्य माणसांसाठी १ नोव्हेंबरपासून खुले होणार आहे. हा प्लाझा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर, द डिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डनशी संबंधित आहे.


लाँचबाबत बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची डायरेक्टर इशा अंबानीने सांगितले की जिओ वर्ल्ड प्लाझाचा हेतू जगातील बेस्ट ब्रँड्सना भारतात आणण्यासोबतच भारताच्या टॉप ब्रँड्सचे कौशल्य आणि कारगिरी सर्वांपर्यंत पोहोचवणे आहे. यामुळे रिटेलचा अनोखा अनुभव भेटेल. सोबतच चांगला ग्राहक अनुभव, उत्कृष्टता आणि नाविन्याप्रती आमची मेहनत प्रत्येक उद्योगात आम्हाला पुढे जाण्यास मदत करणार.



प्लाझाबाबत अधिक माहिती


प्लाझाला रिटेल, आराम आणि खाण्यापिण्याच्या एक्सक्लुझिव्ह हबच्या रूपात डिझाईन करण्यात आले आहे. ७,५०,००० स्क्वे फूट आणि चार मजल्यांवर पसरलेल्या या सेंटरमध्ये ६६ लक्झरी ब्रँड्स एका छताच्या खाली येणार आहेत. यात काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सही असणार आहे ज्यांची भारतात एंट्री झाली आहे. यात बॅलेंसियागा, जॉर्जिया अरमानी कॅफे, पॉट्री बार्न किड्स, सॅमसंग एक्सपिरियन्स सेंटर, EL&N कॅफे आणि रिमोवाचा समावेश आहे.

Comments
Add Comment

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी