मुंबई: इंग्लंड क्रिकेट टीमला आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेविरुद्ध गुरूवारी २६ ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या सामन्यात सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन टीम १५६ धावांवर ढेर झाली. आव्हानाचा पाठलाग करताना २५.४ षटकांत केवळ दोन गडी गमावत श्रीलंकेने हे आव्हान पूर्ण केले.
या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत ९व्या स्थानावर पोहोचला आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत.
सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला, हे मर्यादेपेक्षा कठीण आहे. एक कर्णधार म्हणून मी याचे दु:ख अधिक समजू शकतो. मी एक कर्णधार म्हणून प्रचंड निराश आहे. तसेच टीमबाबतही नाराज आहे. आम्ही आमच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीपेक्षा फार खालच्या स्तराचा खेळ दाखवला. आमच्यासोबत टीममध्ये सध्या अनेक अनुभवी खेळाडू आहेत. तुम्ही एकदम एका रात्रीत वाईट टीम ठरत नाहीत याचाच आम्हाला जास्त त्रास होत आहे.
आम्ही आमच्या कामगिरीपासून खूप कोस लांब आहोत. यामागे काही खास कारण नाही. यावर आम्ही बोट उठवूच शकत नाही. संघ निवड ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यासोबत तुम्ही सातत्याने असता. निवड ही आमच्यासाठी चिंतेची बाब नाहीच. आम्ही चांगला खेळ दाखवू शकलो नाही.