मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आपल्या पत्रकार परिषदांमधून आदित्य ठाकरेच (Aditya Thackeray) दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत, ही आत्महत्या (Suicide) नसून हत्या आहे, असा दावा वारंवार करत असतात. हा दावा खराच ठरला असून आता आदित्य ठाकरे आणखी अडचणीत सापडणार आहेत. राशिद खान पठाण (Rashid Khan Pathan) यांनी आदित्य ठाकरेंना १९ हजार ७० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे.
उच्च न्यायालयातील शपथपत्रांमध्ये खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच, याचिकाकर्ते आणि साक्षीदारांकडून उत्तर प्रदेशात केस दाखल करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, रिपब्लिकन टीवीचे अर्णब गोस्वामी, सुशांत सिंह राजपूत फॅन्स, या प्रकरणांतील साक्षीदार, तक्रारकर्ते या सर्वांकडून आदित्य ठाकरेंविरुद्ध देशभर केसेस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांनांही न्यायप्रविष्ट हत्येच्या प्रकरणाला आत्महत्या न संबोधण्याचं आवाहन केलं आहे.
आदित्य ठाकरेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध सामुहिक बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील सहभागाचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, तरीदेखील कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने आदित्य ठाकरेंना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात यावेत, असं यात म्हटलं आहे. याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून त्यांचंसुद्धा म्हणणं ऐकावं आणि त्यांनादेखील उत्तरवादी बनवावं, अशी मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे यांचा सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंध असून त्याच्याशी संबंधित सर्व पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केली आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. याचबरोबर ८ जून, १३ जून व १४ जून या दिवसांचं आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
८ जून २०२० रोजीचं दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच १३ व १४ जून २०२० रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचंही मोबाईल लोकेशन तपासले जावेत, अशी मागणी राशिद यांनी याचिकेतून केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…