‘आपल्या विविध बँक खात्यांपैकी नागपूर येथील बँक खात्यावर आयकर खाते लक्ष ठेवून आहे. सावध राहा,’ असा मोबाइलवरून एका अनोळखी व्यक्तीकडून एका व्यापाऱ्याला कॉल आला होता. सुरुवातीला व्यापाऱ्याने गांभीर्याने घेतले नव्हते; परंतु चार ते पाच दिवस सतर्कतेबाबत केलेल्या फोनमुळे या व्यापाऱ्यालाही आपल्या खात्यामध्ये काही गडबड तर नाही ना? याबाबत मनात भीती निर्माण झाली. त्यामुळे फोन करणारी व्यक्ती आणि व्यापारी यांच्यामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झाले. आपली कोणीतरी काळजी घेत असल्याचे व्पापाऱ्याला वाटू लागले होते. या व्यापाऱ्याला आयटी विभाग लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे आणि वेळप्रसंगी अटकेची कारवाई होऊ शकते असा धमकीवजा इशारा त्या अनोळखी व्यक्तीने दिला आला. अटक टाळण्यासाठी आपल्याला तडजोड करावी लागेल, असे सांगत त्या व्यक्तीने व्यापाऱ्यांकडे पैशांची मागणी सुरू झाली. भीतीपोटी, या व्यापाऱ्याने त्याला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २१ लाख रुपये भरले,” शिवाय, व्यापाऱ्याच्या नावाने अवैध पार्सल कॅनडाला पाठवले जात असल्याचा आरोप केला गेला होता. त्यामुळे व्यापारी घाबरला होता. मात्र, आपली फसवणूक झाली असल्याचे या व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर या व्यापारी व्यक्तीने या घटनेची माहिती नवी मुंबई पोलिसांना दिली. “या वर्षीच्या ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला होता. सायबर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह भारतीय दंड संहिता कलम ४२०(फसवणूक) आणि ३४(सामान्य हेतू)अंतर्गत फसवणूक करणाऱ्या अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पीडितेच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी, पोलिसांनी व्यवहारात गुंतलेली सर्व बँक खाती तातडीने गोठवली, ज्यात त्यावेळी एकत्रितपणे १८ लाख ८० हजार ३१७ रुपये होते. तांत्रिक मार्गदर्शनाचा उपयोग करून, पोलिसांनी यशस्वीरीत्या गुन्हेगाराचा चेन्नई येथे शोध लावला आणि चेन्नईतल्या अन्नानूर येथून लोकेशकुमार नावाच्या आरोपीला ९ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. पोलिसांनी तांत्रिक माहितीवर काम केले. या रॅकेटमध्ये आणखी काही लोक सामील असण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे काम सायबर पोलिसांकडून केले जात आहे. पोलिसांच्या समयसूचकेमुळे संबंधित आरोपीचे बँक खाते गोठवल्यामुळे, व्यापाऱ्याचे नुकसान वाचले आहे. त्याला ते पैसे परत मिळू शकतात; परंतु या गुन्ह्याचा मास्टर माईड कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
maheshom108@gmail.com
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…