Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीWamanrao Pai : बीजची झाले तरू...

Wamanrao Pai : बीजची झाले तरू…

  • जीवन संगीत : सद्गुरु वामनराव पै

मी या आधीही अनेकदा सांगितले आहे की, अध्यात्म शाखांत बरेचदा सिद्धांत व दृष्टांत यांत दृष्टांत हा कधीही परिपूर्ण नसतो. अध्यात्म शास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे. अनेक विद्वानांच्या सुद्धा हे लक्षात येत नाही. मात्र विषयांच्या आकलनासाठी हे दृष्टांत आवश्यक असतात. उदाहरण द्यायचे झाले, तर
“माझिया विस्तारलेपणाचे
निनावे, हे जगाची नोहे आगवे
जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही
का बीजची झाले तरू, अथवा भांगारूची अलंकारू
तैसा मज एकाचा
विस्तार ते हे जग.”

दृष्टांत काय जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेचि दही हा दृष्टांत Imperfect आहे याची जाणीव ज्ञानेश्वर महाराजांना होती. ते पुढे सांगतात “का बीजची झाले, तरू” हा दृष्टांत मागल्यापेक्षा अधिक चांगला आहे. “भांगारूची झाले अलंकारू तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग.” इथे गंमत अशी आहे की भांगाराचा म्हणजे सोन्याचा विस्तार होत नाही. भांगराला फक्त आकार येतो. विस्तार म्हणजे “एकोहं बहुस्याम्.” एकाचे अनेक होणे हा विस्तार आहे. सोने हे अनेक रूपाने आहे असे वाटते पण फक्त आकार दिलेला असतो. लाकडाचे फर्निचर असते त्यात लाकडाला फक्त आकार दिलेला असतो. म्हणून मी म्हणतो की दृष्टांत हे कधीही परफेक्ट नसतात पण दृष्टांत दिल्याशिवाय विषय चांगला समजत पण नाही. “बीजची झाले, तरू” हा दृष्टांत मला चांगला वाटतो. बीजाला अंकुर येतो, बुंधा, फांद्या, पाने, फुले, फळे येतात हे पहिले, तर इथे विविधता आहे म्हणून “बीजची झाले, तरू” हा दृष्टांत परफेक्ट आहे. हे जग बघितले, तर इथे सगळी विविधता आहे. “बीजची झाले, तरू” हा दृष्टांत जास्त परफेक्ट आहे, तरीही हा दृष्टांत सिद्धांताला परफेक्ट लागू होत नाही, या दृष्टान्तालासुद्धा मर्यादा आहेत. कुठलाही दृष्टांत हा परफेक्ट नसतो हे लक्षात ठेवायचे पण दृष्टांतामुळे आपल्याला विषयाचे आकलन होते. “एकोहं बहुस्याम्” हा परमेश्वराचा विस्तार आहे. एकाचे अनेक झाले.

“अनंतरूपे अनंत वेषे
देखिले म्या त्यासी
बापरखुमादेवीवरू
खूण बाणली ऐसी”
अनंत रूपे अनंत वेषे त्याचा विस्तार झाला आहे, तरी तो जो एक आहे त्याचा विस्तार झालेला आहे. सोन्याचा विस्तार झाला म्हणजे कशालाही हात लावला, तरी सोने लागते. अंगठीला हात लावला तरी सोने व सरीला हात लावला तरी सोने म्हणजे दागिन्याच्या रूपाने सोन्याचा विस्तार झालेला आहे, असे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे आहे. हा जो विस्तार झालेला आहे तो परमेश्वराचा विस्तार नाही. दृष्टांत व सिद्धांत यातला भेद सांगण्यासाठी मी हे सांगितले. परमेश्वराबद्दल आपण जेव्हा बोलतो, तेव्हा कितीही दृष्टांत दिले वीज, हवा, गुरुत्वाकर्षणशक्ती हे सर्व दृष्टांत दिले, तरी हे दृष्टांत perfect नाहीत. परमेश्वराचे स्वरूप असे आहे की, ते आतापर्यंत कुणाला कळलेले नाही. कारण, He is infinite in every respect.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -