Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आत्महत्या

वांद्रे पूर्व उड्डाणपुलावर गळफास लावून तरुणाने संपवले जीवन


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला दिलेल्या मुदतीची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. त्यामुळे आरक्षणाविषयी काही चिन्हे दिसत आहेत की नाहीत, या बाबीवर मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठला आहे. या आंदोलनात पुढाकार असलेले आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी राज्यभर सभांचा सपाटा लावला आहे आणि त्यांच्या सभांना भरघोस प्रतिसादही मिळत आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी आग्रही असणार्‍या ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्याने आत्मह्त्या केल्याने खळबळ उडाली आहे.


सुनील कावळे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. हा तरुण मुळचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे