16 MLA Disqualification : आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही!

आधीच्या वेळापत्रकातील चुका कळल्या तर बदल करता येतील


मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल लागून पाच महिने उलटले तरी आमदार अपात्रतेचा प्रश्न अजून मार्गी लागत नाही. याबाबत विधानसभा अध्यक्षच निर्णय घेऊ शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शिवसेना आणि ठाकरे गट (Shivsena Vs Thackeray Group) या दोघांनीही आपापली उत्तरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे (Rahul Narvekar) सोपवली होती. मात्र यालाही बरेच दिवस उलटल्यानंतर देखील कारवाईची चिन्हे दिसत नाहीत.


राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीप्रकरणी वेळापत्रक तयार केलं होतं. मात्र, या वेळापत्रकावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणीबाबत सविस्तर माहिती देऊन सुधारित वेळापत्रक सादर करण्यास सांगितले होते. आज नवे वेळापत्रक कोर्टात सादर करायचे आहे. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल नार्वेकरांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन या वेळापत्रकात बदल न करण्याचे ठरवले आहे. न्यायालयाने लेखी आदेश दिला तर वेळापत्रकात बदल करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.


दरम्यान, सादर केलेल्या वेळापत्रकात काय चुका आहेत, त्या न सांगता थेट दुसरं वेळापत्रक मागवल्याने अध्यक्ष ही भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधी सादर केलेल्या वेळापत्रकातील चुका सांगितल्या तर अध्यक्ष दुसऱ्या वेळापत्रकाबद्दल विचार करणार असल्याची माहिती आहे.


विधानसभा अध्यक्षांचं आमदार अपात्रता प्रकरणाचं जे वेळापत्रक होतं, त्यानुसार, १३ ऑक्टोबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणी पहिली सुनावणी पार पडणार होती. त्यानंतर २० ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्र करायच्या की, नाही याबाबत निर्णय घेण्यात याणार होता. तर २३ ऑक्टोबरला क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू होणार होतं. तसेच, २३ नोव्हेंबरनंतर पुढच्या तारखा जाहीर करू असं अध्यक्षांनी सांगितलं होतं. मात्र गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं वेळापत्रक फेटाळलं आणि सुधारित वेळापत्रक दाखल करण्यास सांगितलं. यानंतरही अध्यक्ष पुन्हा तेच वेळापत्रक दाखल करणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ