नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सोमवारी १६ ऑक्टोबरला गुगल (google) आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी डिजीटलच्या माध्यमातून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी टेक्नॉलॉजी सेक्टरमधील दिग्गज कंपनी गुगलचा भारतात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमच्या विस्तारामध्ये सहभागी होण्याच्या विचारावर चर्चा केली.
दिल्लीत AI परिषदेचे दिले निमंत्रण
नवी दिल्लीत डिसेंबर २०२३ मध्ये भारताने आयोजित करत असेल्या शिखर संमेलनाबाबतही पंतप्रधान मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी गुगलला येणाऱ्या एआय परिषदेत ग्लोबल पार्टनरशिपमध्ये योगदान देण्यासही आमंत्रित केले.
सुंदर पिचाईंनी गुगलच्या योजनांबद्दल दिली माहिती
पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी(गिफ्ट)मध्ये ग्लोबल फिनटेक संचालन केंद्र खोलण्यासाठी गुगलच्या स्कीमचे स्वागत केले.