मुंबई: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) प्रत्येक टीमला ग्रुप स्टेजमध्ये ९ सामने खेळायचे आहेत. अशातच एखादा संघ एखाददुसरा सामना हरल्यास त्यांच्याकडे पुनरागमनाची संधी आहे मात्र एखादा संघल सलग तीन सामने गमावत असेल तर त्या संघासाठी पुनरागमन नक्कीच कठीण होऊ शकते. सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोघांचेही हेच हाल आहेत.
विश्वचषकात सोमवारी लखनऊमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन संघात टक्कर होणार आहे. दोन्ही संघांसाठी विश्चचषकातील सुरूवात खराब राहिली. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आपले सुरूवातीचे दोन सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाला भारत आणि दक्षिण आफ्रिकेने हरवले होते तर श्रीलंकेला पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला.
पहिल्या विजयाच्या प्रयत्नात
अशातच सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे दोनही संघ विश्वचषकातील पहिला वहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. यातच रविवारी विश्वचषकात धक्कादायक निकालाची नोंद पाहायला मिळाली. दिल्लीत खेळवण्यात आलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडला हरवत हा धक्कादायक निकाल नोंदवला.
श्रीलंकेसाठी चिंतेची बाब म्हणजे दोन्ही सामन्यात पाकिस्तान आणि द. आफ्रिकेविरुद्ध ३००हून अधिक स्कोर केला होता मात्र त्यांचे गोलंदाज महागडे ठरले. श्रीलंकेने ७.८६ धावा प्रति षटकेच्या दराने धावा दिल्या. त्यातच कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे त्यामुळे आता श्रीलंकेचे नेतृत्व मेंडिसच्या हाती आहे.
ऑस्ट्रेलियासाठी त्यांची फलंदाजी सध्या कमकुवत ठरत आहे. आतापर्यंत कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक २०२३मध्ये अर्धशतकही ठोकलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा सध्या स्पर्धेत कोणत्याही संघाच्या सगळ्यात कमी फलंदाजी सरासरी १८.८० आहे तसेच ते २००चा स्कोर गाठण्यातही अयशस्वी ठरले आहेत.