Maratha Reservation : सरकारच्या हातात दहा दिवस, मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा...

आंदोलन शांततेतच होणार पण पुढील आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबरला ठरवणार


एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांची विजय यात्रा निघेल


जरांगे पाटील यांचा जाहीर सभेत इशारा


जालना : ‘संपूर्ण जगाला आणि देशाला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज आज येथे आला आहे. मराठा समाज जसा शांततेत येथे आला तसाच शांततेत जाईलही. पण, आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला मात्र दहा दिवसांनंतर आरक्षण पाहिजे कारण, आरक्षण (Maratha Reservation) आमच्या हक्काचे आहे. या समाजाच्या वेदना आहेत, ही सभा नाही. ही स्वतःच्या लेकरांची वेदना आहे. आज भविष्य आणि अस्तित्व दोन्ही धोक्यात आलंय त्यांच्या मुलांचं. प्रचंड पैसा खर्च करूनही आज समाजातील मुलं बेरोजगार म्हणून जगत आहेत. प्रचंड शिकलेला असतानाही आज मराठा समाज अडचणीत आला आहे. एक टक्का कमी मिळाला तरी नोकरी मिळत नाही. म्हणून ही सामान्य मराठ्यांची लढाई असून ही लढाई आम्हाला जिंकायची आहे’, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.


जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेसाठी उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय... राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय... मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो... घोषणांनी संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेलं आणि मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.


भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच जरांगेंनी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना खाली पाठवले आणि सर्वांना सारखा न्याय असे ठणकावून सांगितले. जरांगे पाटील म्हणाले की, व्यासपीठावरचे सगळे खाली जा, सगळ्यांना सारखा न्याय बाकीचे खाली बसलेत आणि तुम्ही इथं वर, मग मी जाईन हा तिथं, मी मराठ्यांत जात असतो मग खाली... असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी सर्वांना व्यासपीठावरुन थेट खाली पाठवले.


हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि उपस्थितांना प्रमाण करुन मनोज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली. मराठा समाज एक होत नाही, असे बोलणाऱ्यांच्या आज एकत्र जमून मराठ्यांनी मुस्काटात हाणली. कोण म्हणतो मराठा एक होत न्हाय... उपस्थितांनी एकत्र मनोज जरांगेंच्या सुरात सूर मिसळला.



जर १० दिवसात आरक्षण मिळालेले नाही तर पुढे ही आंदोलन शांततेतच होणार पण पुढील आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबरला ठरवणार आणि पुन्हा एकदा शांततेत आंदोलन करत असताना आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले. तसेच एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांची विजय यात्रा निघेल, असा एल्गार त्यांनी यावेळी केला.

१०० एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली होती. काल (शुक्रवारी) रात्रीपासूनच सभास्थळी मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. सभेचं मैदान गर्दीनं गजबजून गेलं आहे. सभा सुरू होण्याआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.


ते पुढे म्हणाले, ‘आमची भावना जर सरकारला समजत नसेल तर त्यांनी काय समजावं. आंदोलन शांततेत होणार त्यात काही बदल होणार नाही. पण, सरकारला आरक्षण द्यावचं लागेल. येत्या दहा दिवसात सरकारने आरक्षण दिलं नाही तरी शांततेचा भंग होणार नाही. आरक्षण दिलं नाही तर पुढील भूमिका ठरवू. मराठा समाज शांत आहे. मायबाप समाजावर माझा विश्वास आहे. शांततेत आंदोलन केलं म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलो. आम्ही काहीही झालं तरी आरक्षण घेणार हे ठामपणे सांगतो आहे. सध्या शिंदे समिती मराठवाड्यात फिरत आहे. सरकारचं म्हणणं आहे की पाच हजार पुरावे पुरेसे नाहीत. माझं त्यांना विचारणं आहे की तुम्हाला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा सापडला तरीही पुरावा. आयोग किंवा समिती स्थापन केली तर ते तरी पाच हजार पानांचा अहवाल देतात का?’, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला आहे.



मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या


मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा

कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी

मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी

दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू