Nashik Crime news : २५ लाखांसाठी डॉक्टर पत्नीचा खून; सासऱ्यासह डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण?


नांदगाव : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे २५ लाखांसाठी डॉक्टर पतीने समव्यावसायिक असलेल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावात दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत डॉक्टर पत्नीच्या भावाने नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. डॉक्टर पती व सासऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेल्या आठवड्यात न्यायडोंगरी गावात दारूड्या पतीचा पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या साहाय्याने खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा न्यायडोंगरी गावात दुसरा खुनाचा गुन्हा घडल्यानंतर न्यायडोंगरी हादरून गेली आहे. मृत डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे (वय २७, रा. न्यायडोंगरी) हिला दगडाने ठेचून व काचेच्या बाटलीने वार करून ठार मारण्यात आले, अशी फिर्याद मृत डॉ. भाग्यश्री शेवाळे यांचा भाऊ सचिन कैलास साळुंखे (रा. तितरखेडा, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. रॉयल लॉन्सच्या बाजूला वाळुज, ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांनी दिली. नांदगाव पोलीस ठाण्यात डॉ. किशोर शेवाळे व त्यांचे वडील नंदू राघो शेवाळे यांच्याविरोधात रजिस्टर नंबर CCTNS ४४५ / २०२३ भादंवि कलम ३०२, ३०४ (ख) ३४ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती अशी की, गेल्या २७ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरा दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉ. भाग्यश्री मृत झाल्याचे सांगितल्याने चाळीसगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पण घटनास्थळ नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने शून्य नंबरने नांदगाव येथे वर्ग करण्यात आला होता.


काल तब्बल १५ दिवसांनंतर मृत डॉ. भाग्यश्रीचा भाऊ सचिन साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बहीण भाग्यश्रीकडे पती डॉ. किशोर, तिचे सासरे नंदू शेवाळे नेहमी घर व दवाखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करीत होते. ही मागणी तिच्याकडून पूर्ण न झाल्याने केवळ २५ लाखांसाठी संशयित डॉ. किशोर शेवाळे, नंदू शेवाळे यांनी डॉ. भाग्यश्रीला दगडाने ठेचून व काचेच्या बाटलीने वार करून मारल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा तपास मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर करत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण

Nashik Ring Road : नाशिककरांना 'ट्रॅफिक जॅम' मधून मुक्ती! ६६ किमी लांबीचा रिंग रोड कसा असेल? ८,००० कोटींचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा!

नाशिक : नाशिक शहराचा जसजसा विकास झाला, तसतशी शहरात वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या

Dondaicha Nagar parishad Election : ७३ वर्षांचा इतिहास मोडला! दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; रावल यांनी कोणते 'गुप्त राजकारण' केले?

धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा

छापेमारी करत वणीमध्ये मिश्रित कोळसा बनवणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई

यवतमाळ : वणी परिसरातील लालपुलिया भागात निकृष्ट आणि प्रदूषणकारक कोळशाची खुलेआम विक्री करणाऱ्या कोळसा

परळीमध्ये महायुतीचा गुलाल! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

परळी: राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी