मुंबई : “समाजात चुकीचे काही दिसले तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार बदलत असते, आपण त्या केसेस मागे घेतो”, असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिलांना अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटातील महिलांचा मेळावा आज मुंबईत पार पडला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, (Rohini Khadse) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
शरद पवार यावेळी पुढे म्हणाले की, अनेक तास बसून देखील कुणी सभागृहाच्या बाहेर गेले नाही. सर्वांनी संघटनात्मक कामाबाबतची भूमिका मांडली आणि ऐकूण देखील घेतली आहे. आपल्याला काही कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत. यामध्ये महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत. आपण महिला आरक्षणाचा निर्णय घेतला होता. आरक्षण निर्णयामुळे स्पष्ट झाले की महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची एका बाजूला परिस्थितीत आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळे आपल्याला जागरुक राहावे लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठे घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर ते केस टाकतील, विविध कलमे लावत असतात. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो.
आता शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली आणि आता शाळा बंद करणे योग्य नाही. असे होत असताना तुम्ही शांत बसत असाल तर हे योग्य नाही. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत. आणि दुस-या बाजुला सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत, हे योग्य नाही.
सरकारी नोकरीमुळे कुटुंबात स्वास्थ्य असते, परंतु कंत्राटी पदावर नेमलं तर तिथं आरक्षण नाही, त्यामुळं मला खात्री आहे तिथं महिलांना संधी मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल.
शाळा खाजगी कंपनीला देण्याचा यांनी निर्णय घेतला आहे. आता जी शाळा कंपनी दत्तक घेईल तिला तिचा वापर करता येईल. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक जिल्ह्यातील एक शाळा मद्य कंपनीला दिली आणि त्यांनी त्या शाळेच्या ग्राऊंडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला, हे गंभीर आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…