सेवाव्रती: शिबानी जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यातील एरंडवणे येथील पटवर्धन बाग परिसरात ‘सेवा भवन’ या वास्तूची निर्मिती केली गेली आहे. जनकल्याण समितीचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रुग्णसेवेसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात ‘सेवा भवन’ हा प्रकल्प पूर्ण झाला असून यामध्ये अत्यल्प दरात डायलिसिस केंद्र तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या जनकल्याण नातेवाइकांसाठी निवास तसेच भोजन व्यवस्था यामध्ये आहे. पटवर्धन बाग परिसरातील २९ हजार चौरस फूट जागेवरील ‘सेवा भवन’ या आठ मजली वास्तूतील एका मजल्यावर पंधरा खाटांचे डायलिसिस सेंटर आहे. तसेच तीन मजल्यांवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी खोल्या बांधल्या आहेत. तेथील भोजन आणि निवास व्यवस्था अत्यल्प दरात आहे. या वास्तूतील एका मजल्यावर जनकल्याण समितीचे निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची योजना आहे. वैद्यकीय समुपदेशन कक्ष देखील चालवला जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने उभारलेल्या ‘सेवा भवन’ या सेवा प्रकल्पातील सर्व सेवा नुकत्याच उपलब्ध झाल्या आहेत. पुण्यातील पटवर्धन बाग परिसरात ‘सेवा भवन’ ही सात मजली इमारत उभी करण्यात आली असून, २७ हजार चौरस फुटांचे या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे. यात १८ रुग्ण क्षमतेचे जनकल्याण डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. तसेच स्व. डॉ. आनंदीबाई जोशी निवास व्यवस्थाही उपलब्ध आहे. या व्यवस्थेत ६४ जणांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध राहील. या प्रकल्पात रुग्ण आणि नातेवाइकांसाठी आवश्यक साहाय्य, आरोग्य सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सेवा अत्यल्प शुल्कात चालवल्या जाणार आहेत.
‘सेवा भवन’मध्ये स्व. मुकुंदराव पणशीकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रही कार्यान्वित करण्यात येत आहे. स्वयंसेवी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी येथे आवश्यक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था राहणार आहे. ‘सेवा भवन’मध्ये जनकल्याण डायलिसिस सेंटर, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना भोजन, जलपान, चहापान, समुपदेशन केंद्रासारख्या सुविधा देण्यात येत आहेत. त्याशिवाय स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा प्रशिक्षण केंद्राद्वारे करण्यात येणार आहे. हे सेवा भवन पूर्णतः समाजाकडून मिळालेल्या धनराशीतून तयार झालं आहे. ‘जनकल्याण समिती’चे कार्य सात आयामातून चालते. आपत्ती, सहकार्य, आरोग्य, शिक्षण, ईशान्यकडचा विकास, संस्कार, स्वावलंबन आणि कृषी विकास. तसेच पर्यावरण व त्यातील आरोग्य या आयामानुरूप हे कार्य पुण्यात सुरू झालं आहे. या वास्तूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक वंदनीय मोहन भागवत यांच्या उपस्थितीचा आशीर्वाद सुद्धा लाभला आहे.
joshishibani@yahoo. com