Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

Accident: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला अपघात, व्हिडिओ व्हायरल

Accident: 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला अपघात, व्हिडिओ व्हायरल

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानसोबत स्वदेस(swades) या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या गायत्री जोशीने इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. गायत्रीचा इटलीत अपघात(accident) झाला आहे. जेव्हा गायत्रीच्या कारचा अपघात झाला तेव्हा ती तिचे पती विकास ऑबेरॉयसोबत होती. या अपघातात व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या अपघातात गायत्री आणि विकास ठीक आहेत मात्र दुसऱ्या कारमधील एक स्विस कपल यांचा मृत्यू झाला आहे.


गायत्री आपल्या पतीसोबत इटलीमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. येथे हा अपघात झाला. द फ्री जर्नल रिपोर्टनुसार हा अपघात इटलीच्या सार्डिनियामधील एका भागात झाला. येथे गायत्री आपल्या पतीसह लॅम्बॉर्गिनी कारमध्ये होती. त्यांची टक्कर फेरारी कारशी झाली.



या कारणामुळे झाला अपघात


रिपोर्ट्सनुसार हा अपघात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला. या दोन्ही कार एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होत्या. ज्यावेळेस दोन्ही कारची टक्कर झाली तेव्हा मिनी ट्रक रोडवर पलटी झाला आणि फेरारीला आग लागते.


 


ठीक आहे गायत्री


द फ्री प्रेस जर्नलने जेव्हा गायत्रीशी संपर्क साधला तेव्हा तिने सांगितले की आम्ही एकद ठीक आहेत. विकास आणि मी इटलीत आहोत. येथे आमचा अपघात झाला. देवाच्या कृपेने आम्ही दोघे एकदम ठीक आहोत.



व्हायरल झाला व्हिडिओ


सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात हा अपघात रेकॉर्ड होत आहे. या व्हिडिओत दिसते की अनेक गाड्या त्या मिनी ट्रकला ओव्हरटेक करतात. त्यानंतर एक गाडी आणि ट्रकची टक्कर होते. यानंतर गाडी आणि ट्रक दोन्ही पलटी होतात.

Comments
Add Comment