Nitesh Rane : उद्धव ठाकरेंवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करुन अटक केली पाहिजे...

बाळासाहेबांच्या शिवसेनेची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करुन टाकली


आमदार नितेश राणे यांनी घेतला उबाठाचा समाचार


मुंबई : आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी हिंदुत्ववादी आणि मराठी माणसांच्या रक्षणासाठी तयार केलेला शिवसेना (Shivsena) नावाचा पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पाटणकर, सरदेसाई या सगळ्यांनी एकत्र मिळून एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करुन टाकला आणि त्यात नफा, तोटा मोजायला सुरुवात केली. दुसऱ्यांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणण्याअगोदर स्वतःच्या मालकाला विचारा की शिवसेनेची ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का बनवली? त्याचे शेअर्स पाटणकर, सरदेसाई अशा लोकांना विकून परदेश दौरे का काढले? असे जळजळीत सवाल उपस्थित करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठाचा (Ubatha) चांगलाच समाचार घेतला.


संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, आज सकाळी नांदेडवर बोलत असताना आमच्या महायुतीवर टीका करण्यात आली. आरोग्यमंत्र्यांचा राजीनामादेखील मागण्याची हिंमत केली. मग मविआची सत्ता असताना कोविडच्या काळात बॉडीबॅग असेल, खिचडी घोटाळा असेल, अन्य औषधांची जी खरेदीविक्री झाली त्यामुळे जो भ्रष्टाचार आता सिद्ध झाला आहे, त्याची ईडी चौकशी सुरु आहे आणि त्याच्यामध्ये तुझ्या मालकाचा आणि मालकाच्या मुलाचं जे नाव घेतलं गेलंय, त्यानुसार कोविडच्या काळात मुंबईकरांना मारुन टाकण्याच्या आरोपाखाली तुझ्या मालकावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे.


पुढे नितेश राणे म्हणाले, तू दुसऱ्यांचे राजीनामे मागण्याअगोदर कोविड काळात जेव्हा महाराष्ट्रातील लोक त्रस्त होते तेव्हा त्याच कोविडच्या पैशांवर स्वतःचं पोट भरणं, आपलं घर चालवणं, परदेशी दौऱ्यांचा खर्च तू आणि तुझ्या मालकाचा मुलगा करत होता. किंवा सुरज चव्हाणच्या वांद्रे येथील कुठल्या हॉटेलमध्ये बसून बैठका झाल्या त्याची पण आम्ही सिरीज बाहेर काढतो. वेबसिरीज काढण्याच्या मोठ्या बाता सकाळी केल्या मग आम्ही पण संजय राऊतांची वेबसिरीज काढायची का? आणि त्यात तुझे डॉक्टर महिलेसोबतचे कारनामे बाहेर काढायचे का? असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.



रोहित पवार आधी स्वतः कुठून धूर येतोय ते तपासा


रोहित पवार यांच्याविषयी पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, रोहित पवार यांना सांगा की त्यांच्या कारखान्याचा धूर थोडा कमी करा. तुम्ही ज्या काही नोटिसा देणार आहात त्यापेक्षा त्या धुरामुळे देखील कामगार आणि लोकांना त्रास होत असेल, त्याबद्दल तुम्हालाच नोटिसा मिळणार आहेत. स्वतः ओसाड गावचे पाटील झाले आहेत ते बघत नाहीत, स्वतःच्या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रणासाठी नोटिसा येतात ते बघत नाहीत आणि उगाच दुसऱ्यांना सल्ले देतात. त्यामुळे आधी स्वतः कुठून धूर येतोय ते तपासा आणि मग आम्हाला सल्ले द्या असं नितेश राणे म्हणाले.



मोहल्ले बांधून देण्याचा कार्यक्रम खपवून घेणार नाही


मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर काही शासकीय अधिकाऱ्यांचा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मोहल्ले बांधून देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. आम्ही तो खपवून घेणार नाही. त्या अधिकाऱ्यांचे आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग्ज आहेत. एका पत्रकाराला हे 'काहीतरी' घे पण ती बातमी छापू नकोस इथपर्यंत सांगणाऱ्या अधिकाऱ्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. लँड जिहादच्या माध्यमातून मालेगावमध्ये जे प्रकार होत आहेत ते थांबवण्यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकाळीच पत्र लिहिलं आहे आणि त्यात संबंधित अधिकाऱ्यांची माहितीदेखील दिली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा