Shivaji Park : शिवाजी पार्कमधील स्विमिंग पूलमध्ये सापडली मगर...

  116

कर्मचार्‍यांची उडाली धांदल


मुंबई : मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क (Dadar Shivaji Park) ही अत्यंत गजबजाटीची जागा आहे. अनेक लोक या ठिकाणी दररोज भेट देत असतात. विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण वर्ग येथे चालवले जातात. तसेच लहान मुलांसाठीही अनेक प्रशिक्षण वर्ग, व्यायामशाळा या ठिकाणी आहेत. त्यामुळे दररोजच पालक आणि लहान मुलांची या ठिकाणी गर्दी होत असते. मात्र, या गर्दीच्या ठिकाणी एक धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वांचीच धांदल उडाली. शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावात (Mahatma Gandhi Swimming pool) तब्बल २ ते ३ फूट लांबीची मगर (Crocodile) आढळून आली. यामुळे कर्मचार्‍यांसोबत सर्वच घाबरले. सध्या मगरीला पकडून तलावाच्या बाहेर काढण्यात आले आहे.


आज सकाळच्या सुमारास तलावाचे इन्स्पेक्शन करत असताना तलावात मगर असल्याचे कर्मचार्‍याच्या लक्षात आले. त्याने लगेच काही जणांच्या साथीने तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. या दरम्यान मगरीने एका कर्मचार्‍याला काही प्रमाणात जखमीही केलं. बाजूलाच असलेल्या प्राणिसंग्रहालयातून ही मगर आली असावी असा अंदाज कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. याआधी देखील अजगर आणि साप याच प्राणिसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराहट निर्माण झाली होती. शिवाय दोन महिन्यांपूर्वी याच स्विमिंग पूलमध्ये सापदेखील सापडला होता. त्यामुळे कोणाला दुखापत झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न या ठिकाणी येणार्‍या नागरिकांकडून विचारला जात आहे.


मार्च एलिगेटर (March alligator) या जातकुळीतील ही मगर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तलावात आढळून येणार्‍या मगरींइतकीच ही मगरदेखील घातक असते. शिवाजी पार्कमधील या स्विमिंग पूलमध्ये सकाळच्या सुमारासच लोक पोहण्यासाठी येत असतात. मात्र त्यापूर्वीच ही मगर सापडल्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.



मनसेची प्राणिसंग्रहालयावर कारवाईची मागणी


मनसेचे संदीप देशपांडे यांनी सांगितले की, स्विमिंग पूलला लागूनच एक अनधिकृत प्राणिसंग्रहालय आहे ज्यात साप, मगर यांसारखे प्राणी अत्यंत दुरावस्थेत ठेवलेले आहेत. ते मोकाट फिरत असतात. त्यामुळे माणसांच्या जीवाला तर धोका आहेच पण त्या मुक्या प्राण्यांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की, झू ऑथोरिटीने यावं आणि हे सगळे प्राणी ताब्यात घ्यावेत आणि त्यांची व्यवस्थित काळजी, निगा घ्यावी.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड