Cylinder Price : महागाईचा झटका, २०९ रूपयांनी महाग झाला व्यवसायिक सिलेंडर

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्याची सुरूवात महागाईच्या झटक्यानी झाली आहे. खरंतर, १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलेंडरचे(LPG cylinder) दर वाढले आहेत. तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आणि यानुसार १९ किलोच्या सिलेंडरमध्ये २०९ रूपयांनी वाढ झाली आहे.



दिल्लीत आता इतकी आहे एका सिलेंडरची किंमत


ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा असे सण येत आहे आणि त्याआधीच तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यवसायिक एलजीपी गॅस सिलेंडरचे दर वाढवले आहेत. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ताज्या २०९ रूपयांच्या वाढीसह नवी दिल्लीत आता १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती आता १७३१.५० रूपये इतक्या झाल्या आहेत. याआधी १ सप्टेंबरपासून व्यवसायिक एलपीजी सिंलेंडरच्या किंमतीत १५७ रूपयांची घट झाली होती.



कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत आहेत हे दर


सप्टेंबरमध्ये व्यवसायक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्यानंतर याची किंमत १५२२ रूपये इतकी झाली होती. १ ऑक्टोबर २०२३ पासून दिल्लीशिवाय इतर महानगरांबाबत बोलायचे झाल्यास कोलकातामध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १६३६ रूपये नाही तर आता १८३९.५० इतकी झाली आहे. तर मुंबईत याची किंमत १४८२ रूपयांवरून वाढून १६८४ रूपये इतकी झाली आहे. तर चेन्नईत याची किंमत १८९८ रूपये झाली आहे.

Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज