Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीTCSमध्ये संपणार वर्क फ्रॉम होम! १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना ५ दिवस जावे लागणार

TCSमध्ये संपणार वर्क फ्रॉम होम! १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना ५ दिवस जावे लागणार

नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये(tata consultancy service) येत्या ऑक्टोबरपासून वर्क फ्रॉम होम बंद होणार आहे. कंपनीने आपल्या इंटरनल ईमेलच्या मदतीने आपल्या वर्कफोर्सला आठवड्यातून ५ दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आयटी सेक्टर आपल्या वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये बदल करत आहे.

इंग्लिश पोर्टल मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार टीसीएसच्या विविध डिपार्टमेंटच्या मॅनेजरनी ईमेलमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसचे काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस हायब्रिड पॉलिसी आणि फ्लेक्सिबिलीटी कायम ठेवणार ज्यामुळे गरज पडल्यास वापरता येतील.

इंटरनल मेलमध्ये दिले गेले आदेश

CNBC-TV18 च्या माहितीनुसार टीसीएसच्या इंटरनल मेलमध्ये लिहिले आहे की, विविध टाऊनहॉलमध्ये सीईओ आणि चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसरने सूचना दिल्या आहेत की सर्व कर्मचाऱ्यांसाठी १ ऑक्टोबर २०२३ पासून सर्व वर्किंग डेजला कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.

टीसीएसने काय दिले उत्तर

सूत्रांच्या माहितीनुसार, ईमेल सर्वांना पाठवण्यात आलेला नाही आणि विविध पद्धतीने हा पाठवण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -