Pune Manache ganpati : पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे झाले विसर्जन

  325

पुणे : पुण्यात सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरुच असल्या तरी पाच मानाच्या गणपतींचे वेळेत विसर्जन पार पडले आहे. कसब्याचा गणपती हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती. तर तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मानाच्या गणपतींचे गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी सातच्या आत विसर्जन करण्यात आले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम होऊ न देता गणरायाच्या भक्तीत लीन होत पुणेकरांनी बाप्पाला निरोप दिला.

कसबा गणपती 




 



 

सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. दुपारी ४:३५ वाजता विसर्जन झाले.

 

तांबडी जोगेश्वरी गणपती




मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू झाली, तर सायंकाळी ५:१० वाजता विसर्जन झाले.

गुरुजी तालीम गणपती




 



मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक दुपारी १२ वाजता सुरू झाली आणि सायंकाळी ५:५५ वाजता विसर्जन झाले.

तुळशीबाग गणपती




मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक दुपारी १ वाजता सुरू झाली, तर सायंकाळी ६:३२ वाजता विसर्जन झाले.

केसरीवाडा गणपती




मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणूक दुपारी २:१५ सुरू झाली, तर सायंकाळी ६:४५ वाजता विसर्जन झाले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी