Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीकैटरीना-सलमानच्या 'Tiger 3'चा टीझर आऊट!

कैटरीना-सलमानच्या ‘Tiger 3’चा टीझर आऊट!

बहुचर्चित ‘टायगर ३’चा टीझर अंगावर शहारे आणणारा

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) ही डायनॅमिक जोडी पुन्हा एकदा सोबत बघायला मिळणार असून ‘टायगर ३’च्या (Tiger 3) टीझरने सोशल मीडिया वर चर्चांना उधाण आलं आहे. ‘टायगर ३’च्या फ्रँचायझीमधील हा थरारक भाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असताना आज टीझर रिलीज झाला आहे.

‘टायगर ३’ हा सिनेमा खूपच दमदार असणार असल्याचा अंदाज टीझरवरुन येत आहे. टीझरमध्ये सलमान आणि कतरिना स्क्रीन शेअर करताना दिसत नाहीत. टीझरच्या सुरुवातीलाच सलमान खान म्हणत आहे, “माझं नाव अविनाश सिंह राठोड.. पण तुम्ही मंडळी मला टायगर म्हणून ओळखता. २० वर्ष देशाची सेवा केली. पण त्या बदल्यात मला काहीच मिळालेलं नाही. टायगर तुमचा शत्रू आहे असं तुम्हाला सांगितलं जात आहे. टायगर गद्दार आहे. गद्दार होतो की देशभक्त हे मी माझ्या मुलाला सांगणार नाही. जिंदा रहा तो आपकी खिदमत में फिर हाजिर नहीं तो जयहिंद…”. १ मिनिट ४३ सेकंदाचा हा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानच्या ‘टायगर ३’ या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता हा अॅक्शन-पॅक्ड सिनेमा बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ त्याच्या अॅक्शन चित्रपटाची मेजवानी सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे.

सलमान खानने ‘टायगर ३’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे, “जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हरा नहीं… टायगर का मेसेज. येत्या दिवाळीत ‘टायगर ३’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘टायगर ३’ या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. तर इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत.

हा अफलातून थ्रिलर आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असून काय वेगळं असणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दिवाळी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘टायगर ३’चा टीझर बॉलीवूडमध्ये लक्ष वेधून घेत असून हा ब्लॉकबस्टर भारतीय चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी प्रभाव टाकेल आणि वर्षाच्या अखेरीस विजय सेतुपतीसह प्रदर्शित होणार्‍या कॅटरिनाच्या मेरी ख्रिसमसचीही चाहत्यांना अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -