Crime: मुंबईत चाकू दाखवून १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

मुंबई : देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या मुंबईतील मुलुंड (Mulund) येथे चाकूचा धाक दाखवून एका १५ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नराधमांनी चाकूचा धाक दाखवून तसेच आईला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेमुळे मुलुंडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे. गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरमध्ये नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद

राखीव खाटा न दिल्याने परळच्या ग्लोबल रुग्णालयावर कारवाई

राज्यमंत्री माधुरी मिसाळ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयाकडून गरीब

ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार मुंबई : नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात