नवी दिल्ली : पावसाचे वेळापत्रक बदलल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. गरज असते तेव्हा पडत नाही आणि नको तेव्हा मुसळधार कोसळून शेती पिकांची नासाडी करतो. एकिकडे शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्चात दुप्पट वाढ झाल्याने, वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच मजुरी असो वा डिझेलचा खर्च किंवा शेतात लागणारे खत, बी बियाणे, प्रत्येकाचे भाव वाढले आहेत. केवळ शेतीच नाही तर कुटुंब चालवण्यासाठी लागणा-या दैनंदिन वस्तूही महाग झाल्या आहेत. अशा स्थितीत उत्पन्न दुप्पट करण्याचा लाभ शेतक-यांना कसा मिळणार, हा मोठा प्रश्न आहे.
जर्मनीची कृषी आधारित कंपनी बायर क्रॉप सायन्सने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील २ हजार ५६ शेतक-यांचा समावेश केला आहे. या सर्वेक्षणानुसार, देशातील ५५ टक्के लहान शेतक-यांनी मान्य केले की, गेल्या काही काळात देशात अन्नधान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच मजुरीचा खर्चही वाढला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शेती करणे कठीण झाले आहे.
बायरच्या या सर्वेक्षणात, ६० टक्के शेतक-यांनी सांगितले की, भारतात डिजिटल तंत्रज्ञान वाढल्याने शेती करणे सोपे झाले आहे. शेतक-यांच्या मते, भारतात वाढत्या डिजिटलायझेशनमुळे पीक सुरक्षा सुधारण्यास मदत झाली आहे.
यासोबतच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १० पैकी ८ शेतक-यांनी त्यांच्या शेतीशी संबंधित भविष्याबाबत आशावादी असल्याचे सांगितले आहे.
या सर्वेक्षणात ४७ टक्के शेतक-यांनी मान्य केले की महागड्या वीजेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. ३७ टक्के शेतकर्यांनी शेतीतील उत्पन्न अस्थिर आहे असे सांगितले आहे. तर ३६ टक्के शेतकर्यांनी पीक सुरक्षा हे मोठे आव्हान आहे, असे सांगितले.
यासोबतच या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या ४२ टक्के शेतक-यांनी मान्सूनमध्ये कमी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा पीक उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…