संसदेच्या विशेष सत्राचे सूप वाजले; महिला आरक्षण विधेयक मंजुरीनंतर दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष सत्राचे आज रात्री उशिरा सूप वाजले. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सभापती जगदीप धनकड यांनी केली. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचे म्हटले.


संसदेचे विशेष अधिवेशन हे १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आले होते. सरकारने कोणताही अजेंडा जाहीर केला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. यामध्ये संसदेच्या जुन्या वास्तूमधून नव्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यात आला. मंगळवारी विशेष अधिवेशनादरम्यान कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडले होते. बुधवारी लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आले. राज्यसभेत एकमताने महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले.


राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत हजेरी लावली. लोकसभेत पंतप्रधान दाखल झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित होत असल्याची घोषणा लोकसभा अध्यक्षांनी केली. महिला आरक्षण विधेयकासंदर्भात केलेली घोषणा ही नव्या संसद भवनात मोदींनी केलेली पहिली मोठी घोषणा आहे.

Comments
Add Comment

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कोलकाता : पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार १५ मार्च रोजी निवडणूक

राज्यसभेसाठी उमेदवार कसे निवडले जातात? एका जागेसाठी किती मते आवश्यक आहेत?, समजून घ्या.

नवी दिल्ली: संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त आहेत. या ३७ जागांसाठी मतदान होणार होते.

ऑस्करच्या रेड कार्पेटवर ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकने हॉलिवूड स्टार्स पडल्या फिक्या

मुंबई: ९८ व्या ॲकॅडमी पुरस्कार सोहळा (Oscars 2026) लॉस एंजेलिस इथल्या 'डॉल्बी थिएटर'मध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.

ओडिशात रुग्णालयाच्या ICU ला आग, एवढ्या रुग्णांचा मृत्यू

कटक : ओडिशातील कटकच्या सरकारी एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी पहाटे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली.