Central railway: मध्य रेल्वेचा नवा प्रयोग...,रेल्वे स्थानकात पाहता येणार सिनेमा

  264

 डोंबिवली, खोपोली,जूचंद्र व इगतपुरी स्थानकांवर प्रयोग


रेल्वेने प्रवास करता करता आता रेल्वे स्थानकांवर सिनेमाही पाहता येणार आहे . प्रवाशाच्या सोयीसाठी आता रेल्वेने प्रायोगिक तत्वावर स्थानक परिसरात प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डोंबिवली, खोपोली,जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.


मध्य रेल्वे मार्गावर दररोज ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मोफत वायफाय, आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित लोकल अशा विविध सुविधा याआधीच उपलब्ध केल्या आहेत. त्यात आता डोंबिवली, जुचंद्र खोपोली, इगतपुरी या स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.


यासाठी रेल्वे स्थानक परिसरात ५००० चौ फुटाची जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी रेल्वेने निविदा मागवल्या असून या प्रस्तावित सिने डोममध्ये ग्राहकांसाठी जेवण,नाश्ता, पेय्यांसह नवीनतम चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच नवीन माहितीपट आणि इतर सामग्री चित्रपट प्रदर्शित केले जातील.मात्र, यासाठी प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेटअप उभारला जाणार आहे. कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सिने डोमचे व्यवस्थापन स्वतःच ऑपरेट करतील. तसेच गर्दीचे व्यवस्थापन करणे ही जबाबदारी परवानाधारकाची असणार आहे. प्री-फॅब्रिकेटेड सिने डोमची स्थापना, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन ही जबाबदारी पूर्णत: परवानाधारकाची असेल आणि त्यासाठी लागणारा खर्च परवानाधारकाला करावा लागेल (त्यात उभारणीचा खर्च, प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम संबंधित वस्तू, संरक्षा आणि सुरक्षा, आवश्यक सुविधा, केबल टाकणे, विद्युत कनेक्शन, वीज वापर शुल्क, वीज जमा आणि इतर प्रासंगिक खर्च इ. समावेश आहे).



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.