India Canada: भारत आणि कॅनडा वादामध्ये उद्योजक आनंद महिंद्रांची उडी...

भारत आणि कॅनडामध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असताना महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कॅनडातून आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती कंपनीने आज भारतीय शेअर बाजाराला दिली.


महिंद्रा अँड महिंद्राची रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये ११.१८ टक्के भागीदारी आहे. कंपनीने स्वेच्छेनं कंपनीचे कामकाज बंद करण्याची घोषणा केली. रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून २० सप्टेंबर रोजी सर्टिफिकेट ऑफ डिझॉल्युशन मिळाले आहे, अशी माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे. लिक्विडेशन नंतर, कंपनीला अंदाजे २८.७ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा  ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 20 सप्टेंबर 2023 रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून आवश्यक कागदपत्रे मिळाली होती, ज्याची माहिती कंपनीला कळवण्यात आली होती. यानंतर रेसनने आपले कामकाज बंद केल्याचे कंपनीने म्हटले आहे. 20 सप्टेंबर 2023 पासून ती कंपनीची सहयोगी नाही.


शेअर मार्केटमध्ये खळबळ...                                                                                                  या बातमीनंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार बंद होण्याच्या 10 मिनिटे आधी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 3 टक्क्यांच्या घसरणीसह 1584 रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र, व्यवहाराच्या सत्रात कंपनीचे शेअर साडेतीन टक्क्यांनी घसरले आणि दिवसभरातील 1575.75 रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचले. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स 1634.05 रुपयांवर बंद झाले होते.


दुसरीकडे, कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात 7200 कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1634.05 रुपये होता आणि कंपनीचे मार्केट कॅप 2,03,025.78 कोटी रुपये होते. आज जेव्हा कंपनीचे शेअर्स 1575.75 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले, तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,95,782.18 कोटी रुपये झाले. अशा स्थितीत कंपनीच्या मूल्यांकनाला 7,243.6 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : शरद पवार-मोदी भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी

Sharad Pawar : विरोधकांच्या रणनीतीदरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र

Sikkim Landslide : सिक्कीमच्या जलविद्युत प्रकल्पात भीषण दुर्घटना; बोगदा कोसळून २० जणांचा मृत्यू, ५ जण बेपत्ता

सिक्कीम : सिक्कीम (Sikkim) मधील नामची (Namchi) जिल्ह्यात एनएचपीसी (NHPC) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पातील (Hydroelectric Project)

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.