Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजKavyaranga : काव्यरंग (बाप्पाचे आगमन)

Kavyaranga : काव्यरंग (बाप्पाचे आगमन)

बाप्पाचे आगमन

भाद्रपद चतुर्थीला
गणरायाचे आगमण
ढोल-ताशे स्वागताला
मनी चैतन्याची उधळण…

शोभिवंत मखरात
बाप्पाचा किती थाट
प्रसाद मोदकांचा
आरतीला सजले ताट…

दहा दिवसांचा पाहुणा
आला आमच्या घरी
भक्तिमय वातावरणात
हात जोडूया सारी…

बाप्पाला शोभून दिसे
दुर्वा, फुलांची माळ
आरतीत मग्न होऊया
सकाळ-सायंकाळ…

सद्बुद्धी दे बाप्पा
दु:खाचा कर नायनाट
सुख-शांती लाभू दे
दाखव समृद्धीची वाट…

– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -