श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिग कर्नल आणि एक मेजर शहीद झाले आहेत. हे अधिकारी 19RR ची कमान सांभाळत होते. भारतीय लष्कराने याला दुजोरा दिला आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीरचे पोलीस डीएसपीही शहीद झाले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांशी चकमकीत कर्नल मनप्रीत सिंह आणि मेजर आशिष धौनेक शहीद झाले आहेत. तर डीएसपी हुमायू भट शहीद झाले आहेत.
ही चकमक अनंतनागच्या गुडूल गावात झाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त टीमला या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी विशेष घेराबंदी तसेच तपास अभियान सुरू केले होते. त्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या प्रारंभित गोळीबारीत ३ सुरक्षा अधिकारी गंभीररित्या जखमी झाले. यात दोन एक कर्नल आणि एक मेजर अधिकारी आहेत तर एक जम्मू-काश्मीरचे पोलीस डीएसपी आहेत.
जेव्हा यांना रुग्णालयात नेले जात होते त्याचवेळेस त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार या भागात दोन ते तीन दहशतवादी होते त्यांनी गोळीबार केला होता.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ट्वीट करत या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. मी लष्कराचे बहादूर रायफलमॅन रवी यांच्या साहस आणि सर्वोच्च बलिदानाला सलाम. देशाच्या प्रती त्यांची निस्वार्थ सेवा नेहमीच लक्षात ठेवली जाईल.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…