‘आता पाकव्याप्त काश्मीरही भारतात येईल’

माजी लष्करप्रमुखांचा दावा


नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर (POK) भारतात कधी सामील होईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या मु्द्द्यावर विरोधकांकडूनही सरकारची कोंडी केली जाते. आता केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह (V K Singh) यांनी पीओकेबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. भाजपाच्या परिवर्तन संकल्प यात्रेनिमित्त सिंह राजस्थानात आल होते. येथील एका कार्यक्रमात सिंह यांना पत्रकारांनी पीओकेमधील लोक भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत. या मुद्द्यावर भाजपची काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर व्ही. के. सिंह यांनी उत्तर दिले.





सिंह म्हणाले, पीओके आपोआप भारतात विलीन होईल. पण यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल.


नवी दिल्लीत पार पडलेल्या जी २० परिषदेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भारतात ज्या प्रकारे जी २० चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या माध्यमातून भारताने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोणत्याही देशाने विचार केला नसेल की भारताकडून अशा पद्धतीने एखाद्या जागतिक परिषदेचे आयोजन केले जाईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताने हे कर्तुत्व सिद्ध केले आहे, असे सिंह म्हणाले.


काश्मिरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असल्याचे म्हटले आहे. पीओकेतील शहरे आणि गावांमधील लोक अन्न टंचाई, महागाई, उच्च करांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण प्रदेशात होत असलेल्या या निषेधासाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्यात येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या