Dhangar Reservation : धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक!

सोलापूर : धनगर समाजही आरक्षणासाठी (Dhangar Reservation) आक्रमक झाला असून यापुढे विखे बाप-लेकाला मतदान करायचे नाही. असा ठाम निर्धार धनगर समाजाने केला आहे.


राज्याचे महसूल मंत्री तसेच नगर व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फेकलेल्या भंडाऱ्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. आपल्या मतांवर निवडणून आलेले विखे पिता पुत्रांना यापुढे मतदान करायचे नाही. त्यांना आमची मतं चालतात मात्र भंडारा नाही, अशा कडव्या शब्दांत धनगर समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध केला.


पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावामध्ये धनगर समाजातील काहींनी विखेंच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, त्यांना आपली मते चालतात मात्र त्यांना आपला पिवळा भंडारा चालत नाही. आज ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी भंडारा आम्ही इतरांना लावतो. मात्र यांना तो सहन झाला नाही. त्यामुळे आता समाज बांधवांनी या विखे पिता पुत्रांना मतदान करायचे नाही हे सुद्धा लक्षात ठेवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी सोलापुरात गेले होते. त्याचवेळी धनगर आंदोलक शेखर बंगाळे हे विखे पाटलांना आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आले होते. त्याचवेळी बंगाळे यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळल्याची घटना घडली होती. त्यानंतर विखेंच्या सुरक्षा रक्षकांनी बंगाळे याला मारहाण केल्याचं दिसून आलं होतं. याच मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Shirdi New Year 2026 : शिर्डीत साईनामाच्या जयघोषात नववर्षाचे स्वागत! तरुण पिढीची साईचरणी मांदियाळी; साईनगरी भाविकांनी दुमदुमली

शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण साईनगरी सज्ज झाली होती.

कसबा गणपती मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती

नऊशे किलो शेंदूर हटवून ऐतिहासिक स्वरूपाचे दर्शन पुणे : पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचे सुमारे

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर