राजापूर : मागच्या काही महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधकांदरम्यान प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) अखेर वेग येणार आहे. कोकणच्या विकासासाठी प्रस्तावित बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पावर देखरेख करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) राजकुमार मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman Al Saud) यांच्यात सोमवारी यासंदर्भात सहमती झाली. सुमारे ४ लाख कोटींचा हा प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जाणार आहे.
एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या राजकुमार सलमान यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. तेव्हा बारसू प्रकल्पासंदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत बारसू प्रकल्पामुळे भारत आणि सौदीची मैत्री आणखी दृढ झाल्याच्या भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदी अरेबिया भारतात ८.२० लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
तेल शुद्धीकरण क्षेत्रातील ‘आरामको’ या सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणाऱ्या कंपनीसोबत केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प कोकणातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवर प्रस्तावित आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…