छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रीमियर आंबा निर्यात केंद्र म्हणून उदयास
-आश्चर्यकारक ३१८ टक्क्यांची वाढ
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (CSMIA)भारतातील आंबा निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून आपली स्थापना केली असून २०२२ ते २०२३ या एक वर्षाच्या कालावधीत आंबा निर्यातीत उल्लेखनीय ३१८ टक्क्यांच्या वाढीसह, सीएसएमआयएने नाशवंत वस्तू हाताळण्यात आपले कौशल्यच दाखवले नाही, तर जागतिक नाशवंत व्यापारातील एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.
सन २०२२ मध्ये, १,१२३ टन आंब्याची निर्यात करण्यात सीएसएमआयएने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २०२३ पर्यंत या आकड्यात आश्चर्यकारक वाढ होऊन ही निर्यात ४,७०० टनांपर्यंत पोहोचली. शिवाय, भारताच्या आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी विमानतळाच्या योगदानावर ते प्रकाश टाकते. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंटऑफ अॅॅॅॅग्रीकल्चर (USDA) ने भारतीय आंब्याच्या युनायटेड स्टेट्समध्ये निर्यात करण्यासाठी नुकतीच दिलेली मान्यता ही या महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये योगदान देणारी महत्त्वाची बाब आहे. यूएसएमध्ये भारतीय आंब्यासाठी बाजारपेठ उघडली जाते, ही आंबा प्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.
सीएसएमआयएच्या आंबा निर्यातीतील यश आणि यावर्षी झालेल्या वाढीचे श्रेय शेतकरी, दूरदर्शी उद्योजक, लॉजिस्टिक कोलॅबोरेटर्स आणि नाशवंत टर्मिनलच्या वचनबद्ध टीमच्या मार्गदर्शनामुळे विमानतळाने परिवर्तनाच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. भारतीय आंब्याची जगभरातील वाढती मागणी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करण्यात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…