Thackeray group : उद्धव ठाकरेंची जळगावमध्ये भाषणबाजी; पण पक्षात राहायला कोणी होईना राजी

आणखी एका नेत्याचा ठाकरे गटाला रामराम


नाशिक : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी आज जळगावात छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. सभा संपल्यावर भाषणबाजी करत सत्ताधार्‍यांवर टीका केली. पण याचा आनंद काही फार काळ टिकला नाही. ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवला आहे.


शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने तसेच भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांना लोकसभेचं तिकीट जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ होते. त्यांनी मातोश्रीवर धाव घेऊन उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त करुनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं म्हटलं जात आहे. ठाकरे गटामध्ये काही आलबेल नसल्याचंच यानिमित्ताने समोर आलं आहे.


दरम्यान, बबनराव घोलप सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी बबनराव घोलप यांची ओळख आहे. माजी मंत्री असलेले बबन घोलप हे देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी धक्का समजला जात आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या