Online fraud : फेसबुकवर मैत्री अन् लाखो रुपयांना गंडा


  • गोलमाल : महेश पांचाळ


गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत. ग्रामीण भागातील शाळेत शिकवत असताना, ती फेसबुकवर नेहमीच अॅक्टिव्ह असायची. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरही फेसबुकवर मोठा मित्रपरिवार झाला होता. फेसबुकवर तिची जून २०२३ मध्ये जॅक्सन जेम्स या परदेशातील तरुणासोबत मैत्री झाली. आपण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे त्याने या शिक्षिकेला सांगितले होते. मैत्री झाल्यानंतर फेसबुकवरून मेसेजवर तो नेहमीच संपर्कात असायचा. त्यामुळे जॅक्सन जेम्सवर थोडा विश्वास निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेम्सने माझा वाढदिवस आहे. मला तुम्हाला आकर्षक गिफ्ट पाठवायचे आहे.


असे तिला आधी सांगितले. त्यानंतर त्यासाठी तिच्याकडे राहता पत्ता मागितला. या पत्त्यावर गिफ्ट पाठवल्याचे त्याने गोड बोलून नाटक केले. पहिल्यांदा शिक्षिकेकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर ७५ हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट आणि नो-टेररिस्ट सर्टिफिकेटकरिता ७ लाख ६० हजार रुपये पाठवण्यास सांगितले; परंतु आपल्याकडे पैसे कमी असल्याचे सांगत या शिक्षिकेने सुरुवातीला ६ लाख ६० हजार रुपये त्याला पाठवले. त्यानंतर अदनान मोहिंदर नावाच्या व्यक्तीकडून शिक्षिकेला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. ‘तुमच्या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंच्या किमतीच्या १० टक्के म्हणजेच १५ लाख ४५ हजार रुपये चार्जेस पेड करावे लागतील’ असे अदनानकडून सांगण्यात आले. त्यानंतर शिक्षिकेने १४ जून रोजी २ लाख ३० हजार आणि १५ जून रोजी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे अदनान मोहिंदरने पाठवलेल्या अकाऊंटवर पाठवले. त्याच्या या नाटकात इतर तिघांचा समावेश होता. ते गिफ्ट दिल्लीला आले, आता घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज पे करावे लागतील, असे पुन्हा शिक्षिकेला सांगण्यात आले. अशा पद्धतीने तिच्याकडून एकूण १२ लाख ३५ हजार ६०० रुपये आतापर्यंत फसवून घेतल्याचा प्रकार घडला. मात्र यामध्ये आपली पूर्ण फसवणूक झाल्याची जाणीव तिला झाली. त्यानंतर या शिक्षिकेने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कलम ४२०, ३४ सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास गोरेगाव पोलीस सध्या करत आहेत.


याआधीही फेसबुक फ्रेंडकडून ठाण्यातील एका महिलेची २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला होता. ऑनलाइन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या महिलेला फेब्रुवारी २०२२ मध्ये एका पुरुषाकडून फ्रेंडशिप रिक्वेस्ट आली होती. तिच्याशी त्याचे नियमितपणे ऑनलाइन चॅटिंग सुरू असायचे. एकदा त्या व्यक्तीने तिला सांगितले की, त्याला त्याच्या आईच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज आहे. हा मेसेज येताच क्षणाचाही विचार न करता संबंधित महिलेने त्याला पैसे पाठवले. आपण आपल्या मित्राच्या गरजेच्यावेळी उपयोगी पडल्याचे तिला समाधान वाटत होते; परंतु त्या दिवसापासून या व्यक्तीकडून मेसेज येणे बंद झाले होते. आपण नकळतपणे फसलो गेले असल्याचे वाटल्यानंतर तिनेही पोलिसात तक्रार केली होती.


तात्पर्य : दुसऱ्याला मदत करणे हे परोपकार आहेत; परंतु नक्की कोणाला मदत करत आहोत, याची खातरजमा करा नाही तर अनोळखी व्यक्तीच्या नादात आपलीही फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


maheshom108@gmail.com



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सप्त पुरस्कारांची शिदोरी...

प्रयोगिक रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांच्या मागे कुणी व्यक्ती भक्कमपणे उभी असण्याची शक्यता तशी कमी असते.

‘सुभेदारांच्या गेस्ट हाऊस’ची मुंबई वारी...

राजरंग-राज चिंचणकर मराठी रंगभूमीवर सध्या सुरू असलेले 'सुभेदार गेस्ट हाऊस' हे नाटक, गेले काही दिवस रंगभूमीवरून

लोककलेचा आवाज

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  डॉ.गणेश चंदनशिवे यांनी कबाड कष्ट करून, खडतर परिस्थितीवर मात करून आपलं अस्तित्व

कथाहोत्र : नाटककारांचे अस्तित्व टिकवणारी सुवर्णसंधी

भालचंद्र कुबल-पाचवा वेद आज मला लिहायचेय ते एका नाट्य उपक्रमाबद्दल. मराठी नाटक जागतिक पटलावर इतर भाषांच्या

रंगभूमीवरचं पहिलंवहिलं पाऊल...

प्रत्येक रंगकर्मी कधी ना कधी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकतोच आणि तिथून त्याचा नाट्यावकाशातला प्रवास सुरू होतो. पुढे

वीण लिखाणाशी ही तुटेना...

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  मुग्धा गोडबोले - रानडे मुग्धा गोडबोले-रानडे सध्या अभिनयासोबत लेखनाची बाजू