Politics : विधानसभेत आपल्याच पक्षावर ताशेरे ओढणारा काँग्रेसचा नेता शिंदेंच्या शिवसेनेत

हा नेता राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचा...


उदयपूरवाटी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. पण यातही एनडीएचीच (NDA) ताकड प्रचंड वाढत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. भाजपला (BJP) साथ देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, तर शिवसेनेत (Shivsena) देखील मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर आता थेट राजस्थानमधून देखील शिवसेनेत प्रवेश होत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची अत्यंत जवळची व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.


राजस्थानचं भवितव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातात असल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) यांचा एकेकाळचा अत्यंत जवळचा सहकारी आणि राजस्थानमधील एक बडा चेहरा असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा (Rajendra Singh Gudha) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.


राजेंद्रसिंह गुढा यांच्या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः राजस्थानला जाणार आहेत. गुढा यांचा मुलगा शिवम गुढा याच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ९ सप्टेंबर रोजी ते उदयपूरवाटी येथे जाणार आहेत. त्याच समारंभात राजेंद्रसिंह गुढा शिवसेनेत नवी इनिंग करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. शिवसेनेचे राजस्थान प्रभारी चंद्रराज सिंघवी यांनी ट्वीट करून गुढा ९ सप्टेंबरला पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.



काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची लाल डायरी गुढांकडे आणि गुढा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये


राजस्थानच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून लाल डायरीची चर्चा भलतीच रंगली आहे. काही दिवसांपूर्वी एका लाल डायरीत राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराचा आलेख असल्याचा उल्लेख अमित शाहांनी केला होता. तेव्हापासूनच राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजली होती. हीच लाल डायरी गुढांकडे असल्याचं बोललं जात आहे. आणि हेच राजेंद्रसिंह गुढा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.



काय आहे लाल डायरीत ज्यामुळे गुढांना काँग्रेसने बडतर्फ केलं?


मागच्या अधिवेशनात काँग्रेसने मणिपूर महिलांचा मुद्दा उचलून धरला त्यावेळेस राजस्थानमध्येच सर्वाधिक बलात्कार होतात, मणिपूरबद्दल बोलण्यापूर्वी आपण स्वतःच्या घरात डोकावलं पाहिजे, असं म्हणत गुढांनी गेहलोत सरकारवरच निशाणा साधला होता. यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी गुढा यांना बडतर्फ करण्यात आलं. बडतर्फ केल्यानंतर गुढा यांनी विधानसभेतच एक 'लाल डायरी' दाखवून आपल्याच पक्षाच्या सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला होता.


आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांच्या घरावर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या छाप्यांपूर्वी ही लाल डायरी आणण्यात आली होती, असा दावा राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत केला होता. लाल डायरीबाबत गुढा यांनी गेहलोत सरकारविरोधात सातत्यानं आरोपांची माळच लावली होती. गुढा यांनी लाल डायरीची तीन पानंही प्रसिद्ध केली होती, ज्यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. त्यामुळे लाल डायरी शिवसेनेच्या हाताला लागली आहे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे मित्र असल्याने काँग्रेसची मोठी गोची झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, 

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा