Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री विखेपाटलांवर चक्क भंडारा उधळला

Share

आरक्षणाच्या मुद्द्यावर आणखी काय काय पाहायला मिळणार?

सोलापूर : राज्यभरात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा जोर धरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या गोंधळातच आता इतर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. धनगर समाजही पेटून उठला आहे. आज तर सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळला. सोलापूर (Solpaur news) शासकीय विश्रामगृहात ही घटना घडली. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर आणखी काय काय पाहायला मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण त्यावर मार्ग न निघाल्याने आज शासकीय विश्रामगृहात या समाजाचे काही प्रतिनिधी आक्रमक झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

सोलापूर दौर्‍यादरम्यान मंत्री विखे पाटील आज शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते व आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले. राधाकृष्ण विखे पाटील निवेदनाचे वाचन करत असताना बंगाळे यांनी सर्वांचीच नजर चुकवून खिशातील भंडारा काढून पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर टाकला व घोषणा दिल्या.

विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवताना त्यांना काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली. सध्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्थानकात या कार्यकर्त्यांना नेण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

7 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

8 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

8 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

9 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

10 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

10 hours ago