मुंबई : आज राज्यभरात दहीहंडीचा (Dahi handi) उत्सव जोरदार साजरा होत आहे. त्यात अनेक दिवस रजेवर गेलेल्या पावसानेही (Mumbai Rain) हजेरी लावली आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना लोकल ट्रेन्सने (Local trains) मात्र निराशा केली आहे. पावसामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. या लोकल्स १५ ते २० मिनीटे उशीरा धावत आहेत. काही लोकल कॅन्सल करण्यात आल्या आहेत, तर काही वेळेच्या मागे – पुढे धावत आहेत. काही काही ठिकाणी तर अनाउंसमेंटच होत नाही, अशी स्थिती स्थानकांवर आहे.
आज दहीहंडीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कामावर जाणार्यांची तितकी गर्दी नसली तरी अशासकीय कर्मचारी रेल्वे स्थानकांवर अडकले आहेत. अनेकजण दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर तर निघाले मात्र ट्रेन्स उशीरा धावत असल्याने त्यांचा उत्साह काही प्रमाणात मावळतो आहे. दरवेळेस पावसामुळे अडणार्या या लोकल ट्रेन्स यावेळेसही मुंबईकरांच्या निराशेला कारणीभूत ठरत आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…