Pen news : पेण मध्ये 'आई डे केअर'च्या गतीमंद मुलांनी हंडी फोडत लुटला दहीहंडीचा आनंद

  278

पारितोषिकांचेही झाले वाटप


पेण : आज संपूर्ण देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. पण शारीरीक कमतरतेमुळे गतीमंद आणि अपंग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता. यासाठीच पेणमधील 'आई डे केअर' स्कुलने अनोखा उपक्रम राबवत गतीमंद मुलांच्या दहीहंडीचे आयोजन केले होते.


या दहीहंडी उत्सवामध्ये ५४ गतीमंद मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला. ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती. यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. गतिमंद मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम 'आई डे केअर' संस्था करत असून गेल्या १३ वर्षांपासून रामेश्वर कन्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचीका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद होत असल्याचे स्वाती मोहिते यांनी व्यक्त केले.



रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचीका यांच्या मार्फत हा अनोखा उपक्रम राबविण्याचे हे तेरावे वर्ष आहे. या कार्यक्रमानंतर सर्व गतिमंद मुलांना पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पेण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, उद्योजक राजू पिचिका आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

रत्नागिरीच्या रस्त्यांवर लवकरच धावणार ई-बसेस, एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे वाटचाल

एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून,

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

गणपती बाप्पाचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविक करतात तारेवरची कसरत मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की कोकणातल्या

कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार

रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने