मुंबई: राज्यभरात आज दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे. गोविंदा रे गोपाळा असे म्हणत गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. मुंबई तसेच ठाणे परिसरात अनेक ठिकाणी दहीहंडीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत दादर, वरळी जांबोरी मैदान, घाटकोपर अशा अनेक ठिकाणी भव्य अशा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दादरमधील दहीहंडी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून साजरी केली जात आहे. यात अनेक विषयावर पथनाट्येसादर केली जातील. तसेच महिला, दिव्यांग ही दहीहंडी फोडणार आहेत.
घाटकोपर येथे दरवर्षीप्रमाणे भाजप आमदार राम कदम दही हंडी उत्सव साजरा करत आहेत. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत उफस्थित असतील. तसेच या दहीहंडीला रोहित शेट्टी, विकी कौशल-कतरिना कैफ, शक्ती कपूर, जितेंद्र ही बॉलिवूडची खास मंडळीही असणार आहेत.
दुसरीकडे मुख्यमंत्र्याच्या ठाणे जिल्ह्यातही दहीहंडीचे मोठ्या जोशात आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याच्या टेंभीनाका, संकल्प प्रतिष्ठा, वर्तकनगर येथे भव्यदिव्य अशा दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्तकनगर येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या मंचावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रीही हजेरी लावणार आहेत. इतकंच नव्हे तर वरूण धवन, विकी कौशल, आयुष्यमान खुराणा ही बॉलिवूडची मंडळीही उपस्थित असतील.
संकल्प प्रतिष्ठान येथील दहीहंडीलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. यावेळी सुनील शेट्टी, चंकी पांडे तसेच इतर बॉलिवूड मंडळीही येणार आहेत.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…