Air Hostess news : …आणि त्याने थेट ‘त्या’ एअर हॉस्टेसची हत्याच केली! तपासातून धक्कादायक बाब उघड

Share

काय आहे हत्येमागचं कारण?

मुंबई : मुंबईतील (Mumbai) पवई भागातील मरोळ येथे भाड्याने एका फ्लॅटमध्ये आपल्या मित्रांसमवेत राहणार्‍या रुपल ओगरे (Rupal Ogrey) या २३ वर्षीय एअर हॉस्टेसची (Air Hostess) हत्या झाल्याची खळबळजनक बातमी काल समोर आली होती. या तरुणीचा मृतदेह राहत्या घरात गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला होता. यातील संशयित असलेल्या इमारतीच्या सफाई कामगाराला काल पवई पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणाचा उलगडा झाला असून सफाई कामगारानेच ही हत्या केल्याचे तपासातून सिद्ध झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रुपल एकटीच घरात होती. यावेळी तिने इमारतीत सफाईचं काम करणाऱ्या विक्रम आटवाल याला क्लिनिंगसाठी घरी बोलावले होते. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला, त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुपलने विरोध केल्यानंतर आटवालने चाकूने तिच्यावर वार करत तिची हत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणी इमारतीचे सर्व सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली होती. यावेळी आरोपी इमारतीत सकाळी ११.३० वाजता गेला आणि त्यानंतर दुपारी खूप वेळानंतर बाहेर पडल्याचे दिसले. शिवाय आत शिरताना त्याने गणवेश घातला होता मात्र बाहेर पडताना तो वेगळ्याच कपड्यांत होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय खरा ठरला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने त्याच्या गणवेशातील रक्ताचे डाग धुतले. कपडे बदलले आणि इमारतीतून बाहेर पडला, हे पोलीस तपासात उघड झालं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित बातमी :-

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

3 minutes ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

14 minutes ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

2 hours ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

3 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

3 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

3 hours ago