INDIA Alliance Meeting: मुंबईत इंडिया आघाडीची बैठक, लोगो होणार जाहीर

मुंबई: इंडिया आघाडीने (india alliance) मुंबईत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीबाबतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बैठक आज ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला (गुरुवार आणि शुक्रवार) मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत आहे. बुधवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती देण्यात आली.


या कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीत सामील असलेले राजकीय पक्षाचे नेते मुंबईत पोहोचतील. संध्याकाळी ६ ते साडेसहा वाजता पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर साडेसहा वाजता सर्व नेता अनौपचारिक बैठक करतील. ३१ ऑगस्टला रात्री आठ वाजता डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.



जाहीर होणार आघाडीचा लोगो


इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी म्हणजेच १ सप्टेंबरला होणार आहे. याआधी १.१५ वाजता आघाडीचे नेते ग्रुप फोटो सेशन करतील. यानंतर बैठक सुरू होईल. ही बैठक दोन वाजेपर्यंत सुरू राहील. बैठक सुरू होण्याआधी आघाडीचा लोगो जाहीर केला जाईल.



बैठकीत पोहोचणार ५ मुख्यमंत्री, ८० नेते


इंडिया आघाडीच्या या मुंबई बैठकीत ५ राज्यांचे मुख्यमंत्री आणि २६ पक्षांचे साधारण ८० नेते पोहोचण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी पोहोचण्याची शक्यता आहे.



या मुद्द्यांवर चर्चा


इंडिया आघाडीच्या या बैठकीत निवडणुकीसाठीची रणनीती, लोगो, जागावाटपाचा फॉर्म्युला तसेच किमान समान कार्यक्रम यावर चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
Comments
Add Comment

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच